कोरोनाची लस सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तिनी ती लावून घ्यावी- आमदार कोरोटे

देवरी २३ : कोरोना विषाणुच्या संसर्गाने पूर्ण देशासह राज्य, जिल्हे व त्यामधील ग्रामीण भागात थैमान घातले आहे. ज्यामुळे लाखो लोक मृत्यु मुखी पडले आहेत. या पार्श्वभूमिवर शासनाने १८ व ४५ वर्षावरील नागरिकांनकरिता कोरोना ची लस मोफत लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. शहरी भागात या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु ग्रामीण व आदिवासी भागात या लसिकरना विषयी ग़ैरसमझ आहे. परंतु या लसिकरनामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या लसिकरनामुळे लोक सुरक्षित होतात. या कोरोना लसिचा पहिला डोज मी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात घेतला आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून १८ व ४५ वर्षावरिल पात्र व्यक्तिन्नी ही लस लावून घ्यावी आणि आपले जीवन सुरक्षित करुण घ्यावे.असे आवाहन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.


ते देवरी येथील ग्रा.रु. यात कोरोना लसीचा पहिला डोज शुक्रवार (ता.२१ मे) रोजी घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार कोरोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना लसिचा उपयोग आपल्या सुरक्षित जीवनाकरिता करुण घेण्याचे आवाहन ही केले.

Print Friendly, PDF & Email
Share