१३ नक्षलींना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश : पुन्हा आकडा वाढण्याची शक्यता

– पुन्हा पाच नक्षलींचे मृतदेह आढळले


प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली विभागाअंतर्गत कोटमी पोमकें अंतर्गत येत असलेलया पैदी जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली यात १३ नक्षलींना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे.
गडचिरोली पोलीस दलाचे सी ६० जवान पैदी जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला, सी ६० पथकाच्या जवानांनी प्रत्यतरादाखल गोळीबार केला असता १३ नक्षलीना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आले आहे. घटनास्थळी शोधमोहिम राबविली असता सुरवातीला ८ नक्षलींचे मृतदेह आढळून आले होत मात्र पुन्हा शोधमोहीम सुरूच ठेवली असता ५ नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले व आकडा १३ वर पोहचला आहे. अदयापही चकमक सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून पुन्हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसनासूर चकमकीनंतर ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. २०१८ मध्ये ४० नक्षली कसनासूर चकमकीत ठार झाले होत. त्यानंतर आज १३ कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीसांना यश आले आहे.

मेडपल्ली-तुमरगुडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ

२६  एप्रिल रोजी नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली तुमरगुडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ करीत घटनास्थळी बॅनर व पत्रके टाकली होती.

गट्टा जांबीया जंगल परिसरातील चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान   

गट्टा जांबीया पोलीस मदत केद्राजवळ २२  एप्रिलच्या मध्यरात्री नक्षल्यांनी गोळीबार करून मोठा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला पंरतू पोलीसांनी वेळीस सतर्क होत सावध पवित्र घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले. रात्रीच्या अंधारात पोलीसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षल्यांनी गोळीबार केला एवढेच नाही तर एक हॅन्डग्रेनेडह फेकला होता. याच पार्श्वभुमिवर पोलीस दलाने २८ एप्रिल रोजी जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली असता दोन नक्षलींना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले.

१३ मे रोजी १४ लाखांचे बक्षीस असणाऱ्या  दोन जहाल नक्षलींना कंठस्नान

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र सावरगाव हद्दतील जंगल परिसरात १३ मे रोजी पोलीस नक्षल चकमक उडाली यात १४ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलींना कठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. यामध्ये एक पुरूष व एक महिला नक्षलीचा समावेश होता. तसेच सदर घटनास्थळावरून मोठया प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षली साहित्य जप्त करण्यात आले होते. 

१९ मे रोजी इसमाची हत्या 

धानोरा तालुक्यातील गॅरापती पोमके अंतर्गत येत असलेल्या वडगाव येथील इसमाची रात्रो १०.३० वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी हत्या केली. दायसिंग अंकलु बोगा असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

Print Friendly, PDF & Email
Share