पोलिस उपविभागीय अधिकार्यासह 2 पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात
5 लाख रूपयांचे लाच प्रकरण : अॅट्रोसिटीच्या गुन्हयांमध्ये ‘मदत’ !
पुणे – दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्हयांमध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी करून ताडजोडीअंती 3 लाख रूपये द्यायचे ठरले असताना 2 लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना येथील पोलिस उपविभागीय अधिकार्यासह 2 पोलिस कर्मचार्यांवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अॅन्टी करप्शन) कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी जाळयात अडकल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुधीर अशोक खिराडकर (वय.45, पोलीस उपविभागीय अधिकारी. जालना, जि. जालना.रा.प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबडचौकी, जालना), संतोष निरंजन अंभोरे (वय .45 वर्ष, पो.ना.246 नेम.कदिम पो.स्टे. जालना. रा.पोलीस लाईन जालना) आणि विठ्ठल पुंजाराम खार्डे (पो.काॅ./162 नेम.एस.डी.पी.ओ.जालना कार्यालय, रा. मु.पो. कडवंचीवाडी ता.जि.जालना) अशी त्यांची नावे आहेत. उपाविभागीय अधिकारी खिराडकर आणि पोलिस कर्मचारी अंभोरे, खार्डे यांनी अॅट्रोसिटीच्या गुन्हयात मदत करण्यासाठी 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रूपये द्यायचे ठरले होते. दरम्यान, आज (गुरूवार) 2 लाख रूपयाची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
घटक :- पुणे
तक्रारदार :- पुरुष वय
55 वर्ष.
आरोपी लोकसेवक :-
1) सुधीर अशोक खिराडकर वय.45, पोलीस उपविभागीय अधिकारी. जालना, जि. जालना.रा.प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबडचौकी, जालना,वर्ग 3
2) संतोष निरंजन अंभोरे वय .45 वर्ष. पो.ना.246 नेम.कदिम पो.स्टे. जालना. रा.पोलीस लाईन जालना.
3) विठ्ठल पुंजाराम खार्डे पो.काॅ./162 नेम.एस.डी.पी.ओ.जालना कार्यालय रा. मु.पो. कडवंचीवाडी ता.जि.जालना.
पडताळणी दिनांक :- 18/5/2021, 19/05/2021
सापळा दिनांक :-
20/5/2021
लाच मागणी :- रु. 5,00,000/-
तडजोडीअंती मागणी 3,00000/-
लाच स्विकारली :- रु. 200,000/-
हकीकत :- तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आलोसे यांनी 5,00,000 रु. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 300,000 रु. लाच रक्कम मागणी करुन, प्रोत्साहन देवुन, 200000/- रुपये. लाच रक्कम आलोसे क्रं.2 यांनी स्वीकारले असता, त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
सापळा पथक : –
पो उप अधीक्षक. श्रीमती. वर्षांराणी पाटील,
पोलीस निरीक्षक.
सुनील क्षीरसागर,
पो.हवा. नवनाथ वाळके,
पो.कॉ. किरण चिमटे
पो.काॅ. दिनेश माने, ला.प्र.वि. पुणे.