नागपूरच्या ‘शरू निमजे ‘नी निभावले ‘माणुसकीचं नातं’ गरजूंना जेवण-नास्ता देऊन निभावला मानवतेचा धर्म…

डॉ. सुजित टेटे / प्रहार टाईम्स

नागपूर 20: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील विविध ठिकाणी ‘माणुसकीचं नातं’ निभावणारे काही मोठ्या मनाचे लोक बघायला मिळत आहेत. परंतु एक महिला उपाशी आणि गरजू लोकांना जेवण भरवितांना नागपूरच्या चौका चौकात दिसत असून ती जवळपास 200-300 गरजूंना दररोज जेवण वाटप करत आहे. खरंतर नागपूर शहरावर कोरोना विषाणूचे भीषण संकट उभे राहिलेले आहे. लोक आपापल्या घरात लॉकडाऊन झालेले आहेत तर काही लोक रस्त्यावर आपला माणुसकीचा धर्म निभावतांना स्पॉट झालेले आहे.

कुणाला फळे वितरण करून मनाला धीर देण्याचे कार्य केले.

रस्त्यावर , दवाखान्यासमोर आपल्या नातेवाईकाच्या बऱ्या होण्याची वाट बघणाऱ्या लोकांना मदतीचा हात दिला.

कोण आहे ‘शरू निमजे’ ?

नागपूरच्या नंदनवन भागात राहत असून ती सामाजिक उपक्रमात नेहमीच क्रियाशील असते. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोक हिताचे कार्य करण्यात नेहमी अग्रेसर असते.

“सामाजिक सेवा करण्यात आपल्याला आनंद मिळत असून आपल्या कडे देण्यासारखे काही नाही परंतु भुकेलेल्यांना जेवण देऊन मानव धर्म निभावता येतो त्यामुळे इतरांकडून प्रेरणा मिळाली आणि आपणही लोकांसाठी काही करावं अशी मनात इच्छा झाली आणि हे कार्य सुरु केले. यामध्ये माझ्या मित्र मैत्रिणीनी सुद्धा मला मदत केली.” शरू निमजे

Share