पवनदीप आणि अरूनिता लव्ह अँगल…. सर्व खेळ TRP चा तर नाही??
इंडियन आयडॉल 12’मध्ये सध्या स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांच्या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे. प्रत्येक भागामध्ये दोघांबद्दल काहीना काही चर्चा केली जाते किंवा ते दोघे एकत्र सादरीकरण करतात. याशिवाय चॅनलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांचे व्हिडीओही शेअर केले जातात, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही चर्चेत आल्या आहेत. मात्र, आता शोचा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याला याबद्दल विचारले असता, त्याने या मागचे संपूर्ण सत्य सांगितले.
आदित्य म्हणाला, दोघेही रिलेशनशिपमध्ये नाहीत. मात्र, दोघेही कधीही याला नकार देत नाहीत आणि हा एक चांगला विनोद आहे. याशिवाय प्रेक्षकांनी स्पर्धकांवर, त्यांच्या सादरीकरणावर आणि कार्यक्रमाच्या वास्तवावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आदित्य म्हणाला. आम्ही सर्व शोचे महत्त्वाचे भाग आहोत. आम्ही या कार्यक्रमाचे प्रदर्शन नेहमीच मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो.
आदित्य पुढे म्हणाला की, ही सर्व एक रणनीती आहे. कारण जर कार्यक्रम 90 मिनिटांचा असेल, तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावे लागते. पवनदीप आणि अरुणिता यांना सतत या गोष्टीवर छेडले जाते. कदाचित भविष्यात या दोघांमध्ये असे काही घडले काय माहित आणि तसे न झाल्यासही कदाचित ते पुढे जातील, मूव्ह ऑन करतील असेही ते म्हणाले. आता ते केवळ कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत.