कचारगड देवस्थान व तीर्थस्थळाचा दर्जा वाढविण्यासाठी आमदार कोरोटे यांची उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा

विकासाकरिता ५० कोटी रुपये निधीची मागणी

देवरी २०: गोंदिया जिल्ह्यातील आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सालेकसा तालुक्यात असलेले धार्मिक देवस्थान व तीर्थस्थळ (पर्यटनस्थळ) कचारगड हे स्थान जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्री पार कोपार लिंगो व माँ काली कंकाली यांचा देवस्थान आहे. हे स्थळ आदिवासी समजासह सर्व जाती, धर्म व समाजातील लोकांकरिता श्रद्धा व आस्थेचे केंद्र आहे. या ठिकाणी दरवर्षी फेब्रूवारी महिन्यात यात्रा भरत असून देशातुन लाखोच्या संख्येने भाविकांचे आगमन होत असते. या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक भाविकांचे ग़ैरसोय होत असते. तरी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्दाला धरून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी या देवस्थान व तीर्थस्थळाचे दर्जा वाढ करून “अ”वर्गाचे देवस्थान व पर्यटन स्थळ बनविण्याकरिता पुढाकार घेवून भागीरत प्रयत्न सुरु केले आहे.या संबंधात आमदार कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजीतदादा पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेवून कचारगड देवस्थान व तीर्थस्थळाच्या भौगोलिक व मूलभूत सोईसुविधेबाबद चर्चा केली आणी या क्षेत्राच्या सर्वांगीन विकासा करीत ५० कोटी रूपयाच्या निधीची मागणी केली आहे.


यात सविस्तर असे की, सालेकसा तालुक्यातील कचारगड येथील धार्मिक व तीर्थस्थळात श्री पारी कोपार लिंगो व माँ काली कंकाली यांचे देवस्थान आहे हे देवस्थान पूर्ण जगात प्रसिद्ध व नावाजलेले आहे.हे ठिकान आदिवासी समजासह सर्व जाती, धर्म व इतर समाजातील लोकांचे श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहे. हे देवस्थान आपल्या भौगोलिक व आध्यात्मिक परंपरे मुळे पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये म्हणून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी या स्थळाचा दर्जा वाढ करुण या क्षेत्राला “अ” वर्ग पर्यटन तीर्थ स्थळ घोषित करण्याकारिता भागीरत प्रयत्न सुरु केले आहे. या संबंधात आमदार सहषराम कोरोटे यांनी मुम्बई येथे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेवून कचारगड देवस्थान येथील भौगोलिक व मूलभूत सोई सुविधे बाबद चर्चा करुण या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता ५० कोटी रूपयाची निधी देण्याची मागनी केली.
आमदार सहषराम कोरोटे यांच्या या प्रयत्नामुळे पर्यटन विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या सह संबंधित सर्व विभागाकडून या विषयी कारवाई सुरु केली असून याबाबद चे पत्र आमदार कोरोटे यांना प्राप्त झाले आहे.


आमदार सहषराम कोरोटे यांच्या भागीरत प्रयत्नामुळे आता कचारगड येथील देवस्थान व तीर्थस्थळाच्या पर्यटन दर्जेत वाढ करुण “अ” वर्ग दर्जा प्राप्त होणार तसेच सोबतच या तीर्थास्थळाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने या बाबद सर्व जनतेने आमदार कोरोटे यांचे आभार मानले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share