Breaking News: देवरी येथील रुग्णवाहिका नाल्यात कोसळली 4 जखमी

गोंदिया : देवरी तालुक्यातील घोनाडी PHC अंतर्गत 102 ऍम्ब्युलन्स गोंदिया येथील relience cancerरुग्णालय परिसरातील नाल्यात कोसळल्याचे वृत्त हाती लागले आहे. ऍम्ब्युलन्स क्रमांक MH 35 D 289 असून वाहन चालक नाव मंगेश हिंगे वय वर्षे 30 , अटेंडन्स भेलावे (57) आणि 2 लहान मुले होती.

सदर ऍम्ब्युलन्स गोंदिया वरून घोनाडी ला औषधी साठा घेऊन जात होती, यात 3 लोक होती वाहनाचे अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात, असल्याची माहिती मिळाली असून हा अपघात रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल जवळील मुख्य मार्गावरील पुलावरुन वाहन खाली कोसळले. या अपघातात ऍम्ब्युलन्स मध्ये असलेले व्यक्ती जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Share