गोंदिया जिल्हापरीषदेतील नेमप्लेट निविदा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत

कमिशनच्या लाभासाठी निविदा पोर्टल लॉक केल्याचा आरोप

गोंदिया २० : गोंदिया जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे 1 कोटी रुपये किमतीच्या नेमप्लेट खरेदी साठी काढण्यात आलेल्या निविदासाठी असलेली जेईएम पोर्टल लॉक असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, गोंदिया जिल्हा परिषद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून कमिशनच्या नादात हा प्रकार होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उल्लेखनीय म्हणजे संबंधित रिपोर्टिंग अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने घोटाळ्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सविस्तर असे की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयांतर्गत नेम प्लेट खरेदीसाठी जेईएम पोर्टलवर ई-निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. या निविदेत भाग घेण्यासाठी टेंडरप्रक्रियेत भाग घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरवठाधारकांना अडथळे निर्माण केल्याचा आरोप होत आहे. या निविदा प्रक्रियेत एका विशिष्ठ पुरवठाधारकाला लाभ पोचविण्याच्या हेतूने सदर पोर्टल लॉक केला असल्याचा आरोप होत आहे.

उल्लेखनीय म्हणजे या प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी एका रिपोर्टिंग अधिकाऱ्याकडे आहे. या अधिकाऱ्याशी संबंधित इच्छुक पुरवठा धारकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, मी बाहेर आहे, तर कधी मी दौऱ्यावर आहे तर कधी मी साहेबांसोबत आहे अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन वर न बोलता कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटण्याविषयी सांगितले जाते. या सर्व प्रकारामुळे 17 मे 2021 या निविदेच्या अंतिम दिनांकापर्यंत इच्छुक पुरवठाधारकांना निवदा भरण्यास अडचणी निर्माण करण्यात आल्या.

उल्लेखनीय म्हणजे हा सर्व खटाटोप केवळ मर्जीतील एका पुरवठा धारकाला लाभ पोचविण्याच्या हेतूने केला जात असल्याची चर्चा जिप वर्तुळात रंगली असून या प्रकरणात कमिशनची जोरदार चर्चा सुद्धा रंगल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे हा घोल दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्व इच्छुक पुरवठा धारकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share