‘कोरोना लसीमुळे माझा 10 वर्षांपासूनचा आजार नाहीसा झाला’; शिक्षकाचा दावा

भोपाळ : कोरोना लस घेतल्यानंतर काहींना त्रास होतो. तर काहींना बिलकुल त्रास होत नाही. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. अशात मध्य प्रदेशातील बडवानी येथील एका शिक्षकाने लसीबाबतचा एक वेगळा अनुभव शेअर केला आहे. कोरोना लसीमुळे या शिक्षकाचा चक्क 10 वर्षे जुना आजार बरा झाल्याचं समोर आलं आहे.

शिक्षकाला गेली 10 वर्षापासून पायाच्या तळव्याला खाज येणे आणि जळजळ होणे ही समस्या होती. बरेच उपचार घेऊनही त्याची ही समस्या बरी होत नव्हती. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर हा  आजार नाहीसा झाला, असा दावा शिक्षकाने केला आहे. काशिराम कनोजे असं या शिक्षकाचं नाव असून ते येथील कुंजरी गावात राहतात. भंवरगढ येथील माध्यमिक विद्यालयात काशिराम शिक्षक आहेत.

काशिराम यांनी 11 एप्रिल रोजी जमानिया उप आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला त्यानंतर 5 दिवसानंतर त्यांना तळव्याची जळजळ कमी झाल्याचं जाणवू लागलं.

काशिराम यांना याआधी खुर्चीवर पाय खाली सोडून बसता येत नव्हतं. मात्र आता काशिराम आरामात झोपू शकतात आणि खुर्च्याखाली पाय ठेवून आरामात बसू शकतात. लसीकरणामुळेच 10 वर्षांपासून असलेला खरुजेचा त्रास संपूर्ण बरा झाल्याचं शिक्षक काशीराम यांनी सांगितलं आहे.

Share