महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना गोंदियाच्या वतीने मागण्यांचे निवेदन

गोंदिया १८: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांना महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना गोंदिया च्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

कृषी सहायकांच्या मागण्या:

1)कृषी सहाय्यक यांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करणे
2) कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्या सर्व कृषी सहाय्यक यांना विनाअट 50 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
3)सर्व कृषी सहाय्यक यांना वयाची अट न ठेवता covid-19 ची लसीकरण करावे
4) इतर खात्याप्रमाणे covid-19 च्या काळात जनसंपर्क वाढविणाऱ्या विविध कार्यक्रम जसे की गाव बैठक; प्रशिक्षणे ;शेतीशाळा कोरोना परिस्थितीमुळे स्थगित करण्याबाबतचे निर्देश देणे कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर पूर्ववत कार्यक्रम राबविण्यात येतील .
वरील मागण्या करिता महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा गोंदिया याचे पूर्ण सहमत असून मागण्या पूर्ण न झाल्यास संघटना आंदोलनात सहभागी होईल

आंदोलनाची टप्पे:

1)दिनांक 19/05/2021 ला कार्यालय प्रमुखांना आंदोलनात बाबत निवेदन सादर करणे
2)दिनांक 24 /5/ 2021 ते 26/ 5 /2021 कृषी सहाय्यक काळी फिती लावून काम करणे. 3) 28/ 5 /2021रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन
4)दिनांक 1 जून 2021 ते 4-6-2021 दरम्यान कामकाजाचे रिपोर्टिंग न करता असहकार पुकारणे यानंतरही मागण्यांची सोडवणूक न झाल्यास नाइलाजास्तव आंदोलन तीव्र करण्यात येईल.

मागण्यांचे निवेदन सादर करतां नी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा गोंदिया चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पारधी जिल्हा सचिव इन्‍द्रपाल बागडे कार्याध्यक्ष ,सुरेंद्र खुजे प्रामुख्याने उपस्थित होते

Print Friendly, PDF & Email
Share