गोंदिया जिल्ह्यात आज 310 रुग्णांची कोरोनावर मात

गोंदिया,दि.18 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 18 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 190 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 310 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आजपर्यंत 39,651 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 36,251 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 2755 आहे. 2022 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 645 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 91.07 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.62 टक्के आहे तर डब्लिंग रेट 51 दिवस आहे.

जिल्ह्यात आज 190 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया-87, तिरोडा-06, गोरेगाव-04,आमगाव-30, सालेकसा-16, देवरी-28, सडक अर्जुनी-01, अर्जुनी मोरगाव-15 व इतर राज्य/जिल्हा-03 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील 310 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-165, तिरोडा-22, गोरेगाव-38, आमगाव-20, सालेकसा-13, देवरी-15, सडक अर्जुनी-19, अर्जुनी मोरगाव-14 व इतर राज्य/जिल्हा-04 रुग्णांचा समावेश आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 145867 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 120897 नमुने निगेटिव्ह आले तर 20720 नमुने पॉझिटिव्ह आले. 833 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 147400 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 126780 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 20620 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Print Friendly, PDF & Email
Share