#RefundExamFees नावाने सोशल मीडिया विद्यार्थ्यांचा अनोखा आंदोलन
प्रहार टाईम्स/ गोंदिया 18: नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी ची परीक्षा रद्द केली आहे , त्यामुळे व विद्यार्थ्यांनी भरलेली फी वापस मिळेल या आशेवर पालक लोक आहेत,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत यांनी महाविद्यालयाने विद्यार्थ्याकडून महविद्यालयीन आणि उन्हाळी २०२१ परीक्षेचे शुल्क घ्यायची गरज काय?असे प्रश्न उपस्थित केले आहे. महाविद्यालयाचे शुल्क कमी करावे या मागण्यांना घेऊन ऑनलाईन पध्दतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी आंदोलन १७ मे पासून चालू केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क माफ व्हावेआणि महाविद्यालयाचे शुल्क कमी करावे या मागण्यांचे मेल मा. कुलगुरू आणि मा. शिक्षण मंत्री यांना पाठवावे आणि मेल चा स्क्रिनशॉट हा #RefundExamFees आणि #ReduceCollegeFees हे हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर पोस्ट करून या
आंदोलनात सहभागी व्हावे. असे
आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
विदर्भ प्रांत सह मंत्री राहुल श्यामकूवर यांनी केले आहे