बिग बॉस (Big Boss) फेम रुबिना दलैकची कोरोनातून नुकतीच सुटका

मुंबई, 18 मे-  छोट्या पडद्यावरील (Tv Actress) प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 Winner) ची विजेती रुबिना दिलैकला(Rubina Dilaik)  काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. रुबिनाने स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. ती सध्या आपल्या कुटुंबांसोबत हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर तिचा पती अभिनव शुक्ला केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ च्या शुटींगमध्ये बिझी आहे.

महिन्याच्या सुरुवातीला रुबिनाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केल होतं. रुबिनानं म्हटलं आहे, की या काळात तिने स्वतःची काळजी घेतली. आणि आपल्या कुटुंबाला स्वतः पासून अगदी दूर ठेवलं होतं. अशा पद्धतीने अगदी धाडसाने रुबिनाने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. रुबिनाचं चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक देखील होत आहे.

Share