?अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांना दर 15 दिवसात कोरोना चाचणी बंधनकारक

55 RTPCR आणि 30 RAT चाचण्यापैकी 5 नमुने पॉझिटिव्ह आढळले

देवरी 15: राज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकानदार आणि कर्मचारी यांनी दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकानदार , औषध विक्रेते यांचा सामान्य नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क येत असतो त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने या सेवा देणाऱ्या दुकानदारांना त्यांचे आस्थापने अटी आणि शर्तीवर सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

देवरी तालुक्यात शेकडो अत्यावश्यक सेवा देणारे आस्थापने असून त्यांचा संपर्क जनतेशी येतो त्यामुळे त्यांनी नियमानुसार दर 15 दिवसांनी आपली कोरोना चाचणी करून निगेटिव्ह अहवाल आपल्या जवळ ठेवावा असे सूचना प्रशासनाने वेळोवेळी दिल्या होत्या. आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांनी पुन्हा कोरोना चाचणी करावी आणि निगेटिव्ह अहवाल असेल तरच आस्थापन सुरु करावे असे स्पष्ट आदेश देवरीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दुकानदारांना दिलेले आहेत.

पंचशील चौक येथे घेण्यात आलेल्या 55 RTPCR आणि 30 RAT टेस्ट झाल्या असून 5 नमुने पॉसिटीव्ह आले असल्याची माहिती डॉ. ललित कुकडे , तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी यांनी दिली आहे .

दुकानदार , औषध विक्रेते , भाजीविक्रेते आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व आस्थापन मालकांनी पुन्हा कोरोना चाचणी करून घ्यावी , त्याशिवाय दुकाने उघडू उद्या रविवारी-दुर्गा चौक येथे चाचणी कॅम्प आयोजित केला आहे. “- मुख्याधिकारी अजय पाटणकर

Print Friendly, PDF & Email
Share