गोंदियातील 10 केंद्रावर कोवीडशिल्डचे 6000 लस दुसर्या डोजकरीता उपलब्ध

गोंदिया,दि.13ः- तालुक्यातील 24 लसीकरण केंद्रावर यापुर्वी कोव्हॅक्सीन ही लस उपलब्ध करण्यात आली होती.आता 10 केंद्रावर 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोवीडशिल्डचा दुसरा डोज देण्याकरीता 600 लस उपलब्ध करुन देण्यात आल्याने पहिला डोज घेतलेल्या नागरिकांनी कोवीडशिल्डचा दुसरा डोजचा लाभ 15 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.यामध्ये नगरपरिषद शाळा गणेशनगर ,नगरपरिषद शाळा गोविंदपूर,नगरपरिष हायस्कुल रामनगर,नगर परिषद गल्स हायस्कुल अग्रसेन भवनजवळ,जे.एम.पटेल स्कुल अवंती चौक,मालवीय स्कुल श्रीनगर,मनोहर म्युन्सीपल स्कुल स्टेडीयमजवळ गोंदिया,नगपरिषद शाळा माताटोली,नगरपरिषद शाळा रेलटोली गुुजराती शाळेसमोर,शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारेनगर येथे प्रत्येकी 600 कोवीडशिल्ड लस उपलब्ध असून नागरिकांनी केंद्रावर जाऊन नोंदणी(स्पॉट रेजिस्ट्रेशन करावे) करुन लसीकरण करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती सवरंगपते यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share