१४ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलींना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश


प्रतिनिधी / गडचिरोली :
उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद सावरगाव हद्दीतल जंगल परिसरात आज 13 मे रोजी सकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली यात दोन नक्षली ठार झाले असून त्यांच्यावर 14 लाखाचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते. ठार झालेल्यांमध्ये एक पुरूष व एक महिला नक्षलीचा समावेश आहे.
उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद सावरगाव हद्दीतल जंगल परिसरात नक्षली टिसीओसी कालावधी दरम्यान घातपात करण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात नक्षल एकत्र आले आहेत. अशा गोपनिय माहितीवरून अवप पोलीस अधीक्षक मनीष कलावानिया यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वात मोरचुल जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना सकाळी 6 ते 6.30 वाजताच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या 45 ते 50 नक्षल्यांनी सी-60 जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युतरादाखल व स्वरंक्षणासाठी जवानांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी चकमकीनंतर पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी 60 जवानांनी शोध अभियान राबविले असता दोन जहाल नक्षली बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांना गडचिरोली येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषीत केले. मृतामध्ये एक पुरूष व एक महिला नक्षलीचा समावेश आहे.
राजा उर्फ रामसाई नोहरू मडावी (33) रा. मोरचुल ता . धानोरा तो टीपागड एरीया कमीटी प्लाॅटून क्रमांक 15 चा कमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर विविध कलमान्वये खून, जाळपोळ, चकमक असे एकुण 44 गुन्हे दाखल होते.
रनिता उर्फ पुनिता चिपळुराम गावडे (28) रा. बोटझरी ता. धानोरा असे असून ती कसनसून एलओएस मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर विविध कलान्वये खून, चकमक व इतर असे 9 गुन्हे दाखल होते.
शासनाने राजा उर्फ रामसाई मोहरू मडावी याच्यावर 12 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर रनिता उर्फ पुनिता चिपळुराम गावडे हिच्यावर 2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दोघांवर असे एकुण 14 लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर शोध मोहीमेदरम्यान घटना स्थळावर एक एसएलआर रायफल, 8 एम.एम. रायफल, कुकर बाॅम्ब व आईी असे स्फोटक साहित्यांसह नक्षलवाद्यांच्या दैनदिनी वापराचे साहित्य मोठया प्रमाणात जप्त करण्यात आले. सदर चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल्यांच्या टिसीओसी कालावधीदरम्यान नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Share