सामुहिक वनहक्काचे समस्या मार्गी लावणार- आमदार सहषराम कोरोटे

सामुहीक वनहक्क परीक्षेत्र पालांदूर/जमी. अंतर्गत घोनाड़ी येथे सभेचे आयोजन

देवरी 13: तालुक्यातील सामुहीक वनहक्क परीक्षेत्र पालांदूर/जमी.अंतर्गत घोनाड़ी येथे सामुहीक वनहक्क ह्या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. वनहक्क परिक्षेत्रामध्ये मोडणाऱ्या समस्यांवर आमदार सहषराम कोरोटे यांनी चर्चा करुन मार्गदर्शन केले. आणि सामुहिक वनहक्काचे समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


सदर सभेमध्ये सोनुजी नेताम सरपंच तथा अध्यक्ष, देवविलास भोगारे सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष वनसमिति मगरडोह, गजाननजी भोयर अध्यक्ष पालांदुर , तुलारामजी राऊत अध्यक्ष गरारटोला, उमेश बागडेरीया अध्यक्ष पळसगाव,सौ.फुलवंताबाई बागडेरीया सरपंच पळसगाव,सौ.लिलाबाई मुंदी रोपा सौ.कुंतीबाई बोहुर्ले उपसरपंच रोपा, गोपालजी कुरसुंगे पो.पाटील पळसगाव,मा.विजयजी पुराम चुंभली,राजकुमारजी चौधरी टेकरी,व सर्व सामुहीक वनहक्क समितिचे पदाधिकारी सदस्य,सरपंच/सदस्य गावकरी बंधु उपस्थित होते.

Share