गोंदिया वरून विमान प्रवास करायचं ? जाणून घ्या तिकीट कशी बुक करायची !

गोंदिया विमानतळ मार्गे हैदराबाद, इंदोर विमानसेवा लवकरच!

डॉ. सुजित टेटे
गोंदिया 13: आंतरराष्ट्रीय स्तराचे बिरसी येथील विमानतळाचा प्रवासी वाहतुकीचा मार्ग आता सूकर झाला आहे. गोंदिया मार्गे हैदराबाद, इंदोर विमानसेवा जूनपासून सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिग चार्टर एअर लाइन्स(फ्लाय बिग) या कंपनीने बिरसी विमानतळावरून मध्य प्रदेशातील इंदोर-गोंदिया-हैदराबाद आणि हैदराबाद ते गोंदिया-इंदोर येथे प्रवासी विमानसेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे. यामुळे गोंदिया जिल्हा आता चार्टर विमानसेवेने जोडला जाणार आहे.

तिकीट कशी बुक करायची जाणून घ्या : बिग चार्टर एअर लाइन्स(फ्लाय बिग) सध्या कोलकाता , गुवाहाटी , शिलॉंग , रुपसी , हैदराबाद , इंदोर , रायपूर , भोपाळ या ठिकाणाहून आपली सेवा देत असून लवकरच गोंदिया वरून सेवा देणार आहे.

फ्लाय बिग चे तिकिटासाठी सर्वप्रथम https://flybig.in/book या संकेत स्थळाला भेट देऊन आपला डेस्टिनेशन निवडायचं आहे. सध्या गोंदिया डेस्टिनेशन या लिस्ट मध्ये नसून जुन मध्ये लिस्ट मध्ये येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे .

https://flybig.paxlinks.com/search-schedule

Step -1. https://flybig.in/book
Step -2. https://flybig.paxlinks.com/search-schedule
स्टेप-3

सध्या कोलकाता वरून गुवाहाटी साठी 1500/- ते 2100/- रुपये अशी तिकीट आकारण्यात येत असून गोंदिया वरून तिकीट दर किती असेल या कडे सर्वांचे लक्ष आहे .

डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशन) ने बिरसी विमानतळाची तपासणी केल्यावर विमानतळावा परवाना तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच 11 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना विमानतळावर आवश्यक सुविधा व प्रक्रिया पूर्ण करण्याचे पत्र दिले आहे. विशेष म्हणजे तत्कालीन केंद्रीय विमान वाहतुक मंत्री प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदियाच्या बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले. याठिकाणी शासकीय व अशासकीय वैमानिक प्रशिक्षण सध्या सुरु असून रात्रीला सुध्दा विमान उतरण्याची व धावण्याची सोय धावपट्टीवर करुन ठेवली आहे.त्यांच्या कार्यकाळात जरी विमान वाहतुक सुरु होऊ शकले नसले तरी त्यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते.त्यातच विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी या विमानतळावरुन प्रवासी व वाणिज्यिक विमान धावावे यासाठी सातत्याने बैठका घेत दिल्लीपर्यंत पुढाकार घेतला होता हे सुध्दा विशेष.

विमानतळाचा परवाना देण्यासाठी डीजीसीएच्या पथकाने बिरसी विमानतळाची धावपट्टी व सुरक्षेचे निरीक्षन केले असून लवकरच क्षेत्रीय विमानसेवा सुरु करण्यास हिरवी झेंडी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ‘फ्लाय बिग’ या विमान कंपनीद्वारे जूनपासून इंदोर-गोंदिया-हैदराबाद व हैदराबाद-गोंदिया-इंदोर विमानसेवा सुरु करण्यासाठी कंंपनीने 72 खुर्ची एटीआर विमान निवडल्याची माहिती आहे. डीजीसीएने विमान निरीक्षनानंतर कंपनीला विमानसेवा पुरविण्याची अनुमती दिली आहे. दरम्यान, बिरसी विमानतळावरुन प्रवासीसेवा सुरु करण्यासंदर्भात डीजीसीएने 11 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन आवश्यक सोयीसुविधा व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता बिरसी विमानतळावरुन प्रवासीसेवा सुरु होण्याचा मार्ग सूकर झाला आहे. याचा लाभ गोंदिया शेजारी जिल्हे तसेच सीमावर्ती मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील काही जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी, अधिकार्‍यांना होणार आहे. तसेच भविष्यात देशविदेशातील मोठ्या विमानतळाकडे उड्डाने भरण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते.

लवकरच उड्डाण मंत्रालय विमानसेवेला मंजुरी प्रदान करणार आहे. विमानतळावरील सुरक्षा, संरक्षण आणि अग्निश‘न सेवा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हाधिकाèयांकडे मागणी केली असून कोल्हापूर आणि जळगावच्या धर्तीवर या विमानतळावरदेखील पाणी आणि वीज राज्य शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे.

गोंदियाजवळील बिरसी येथे इंग्रजकालीन विमानतळाला आंतरराष्ट्रीयस्तराचे विमानतळ बनविण्यासाठी माजी विमान वाहतूक केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाने याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु झाले असून येथून निघालेले अनेक पायलट देशात सेवा देत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे. मात्र या विमानतळावरुन प्रवासी व माल वाहतूकसेवेची प्रतिक्षा जिल्हावासीयांना होती. यासंदर्भात खा. पटेल यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, केंद्र सरकारने सुरु केलेल्या लहान व मध्यम शहरातील विमानतळावरुन क्षेत्रीय विमान प्रवासीसेवेतंर्गत बिरसी विमानतळाचा समावेश करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share