“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा” यूट्यूबची घोषणा
नवी दिल्ली: काही महिन्यांपुर्वी जगातील सर्वात लोकप्रिय असलेलं अॅप टिकटॉक भारतात बॅन करण्यात आलं आहे. हे अॅप बॅन झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी टिकटॉक सारखं अॅप बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र टिकटॉक एवढा प्रतिसाद कोणालाच मिळाला नाही. अशातच आता यूट्यूबने एक मोठी घोषणा केली आहे.
शॉर्ट व्हिडीओ बनवणं हे आजकालच्या तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यासाठी टिकटॉक अॅप वापरला जात होता. मात्र काही कारणांमुळे काही महिन्यांपुर्वी टिकटॉक बॅन झालं. यानंतर अनेक कंपन्यांनी टिकटॉक सारखे अॅप लाँच केले. अशातच यूट्यूबने देखील शाॅर्ट व्हिडीओचं फिचर लाँच केलं आहे. मात्र त्याला देखील टिकटाॅकसारखा जोरदार प्रतिसाद मिळाला नाही.
आता यूट्यूबने एक मोठी घोषणा केली असून यूट्यूब आता टिकटाॅकला जोरदार टक्कर देण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. नुकत्याच केलेल्या यूट्यूबच्या घोषणानुसार आता यूट्यूबच्या शॅर्ट व्हिडीओ फिचरचा वापर करुन शाॅर्ट व्हिडीओ बनवून पैसे कमवता येऊ शकेल.
दरम्यान, या घोषणेनंतर आता अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. टिकटाॅकनंतर सध्या यूझर्स इन्स्टाग्रामवरील रिल्स हे फिचर मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचं दिसून येत आहेत. टिकटाॅक बॅनवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मिक्स टकाटक, मोज असे अनेक अॅप आले. मात्र लोकांना ते आवडलं नाही.