भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टर प्लान, ४ सूत्री कार्यक्रमाने कोरोनावर नियंत्रण

प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्राच्या टॉप १० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आल्यावर भंडारा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी अॅक्शन मोडवर येत कोरोना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला असून ४ सूत्री कार्यक्रमाच्या अवलंब करत भंडारा जिल्हाला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून ठेवले आहे.

भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना ग्रस्थाची दुप्पट रुग्णसंख्या वाढत तब्बल ३८ हजार ३०९ लोक कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळले असून दुसऱ्या लाटेत तब्बल ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मास्टर प्लान तयार करत चार सूत्री कार्यक्रम आखुन त्याची कड़क अंमलबजावणी सुरु केली.

या चार सूत्री कार्यक्रमात जास्तीत जास्त कंटेनमेंट झोन Containment Zone तयार करणे कडक लॉकडाउन Lock Down लावणे, जिल्ह्यातील मेडीकलवेस्ट (वैद्यकीय कचरा) जिल्ह्या बाहेर पोहचवून नष्ट करणे व जास्तीत जास्त बाधित अतिगंभीर रुग्णाना ऑक्सीजन कॉन्सट्रेंटर पुरविणे, ह्या बाबी समाविष्ट केल्या.

Share