दुबईकर धावले नागपूरकरांच्या मदतीला : ऑक्सिजन कॉन्स्ट्रटेर्स व सिलेंडर्स जहाजाने रवाना

नागपुर : मध्ये कोरोनाचा भीषण प्रकोप दिसून आला. त्यामुळे रुग्णालयात बेड आणि रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागलीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागपूरसह विदर्भाला त्राही भगवान करून सोडलंय. रुग्णालये हाऊसफूल्ल झाली आहेत. उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोर्चा सांभाळत मदतीचे आवाहन केले.


गडकरींनी मदतीची साद घातलाच त्यांना थेट दुबईहून प्रतिसाद लाभला. मुळचे नागपूरकर असलेल्या डॉ संजय पैठणकर यांनी दुबईतील भारतीय मित्रांच्या मदतीने नागपूर शहराच्या मदतीकरता पुढाकार घेतला.
त्यांनी 500 हुन अधिक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स आणि 400 ऑक्सिजन सिलेंडर्सची व्यवस्था केलीय. डॉ पैठणकर यांच्या पुढाकारातून 150 ऑक्सिजन कॉन्स्ट्रटेर्स एअर लिफ्ट करून चीनहून पुढील दोन तीन दिवसात नागपूरला पाठवण्यात येत आहे. तर 400 ऑक्सिजन कॉन्स्ट्रटेर्स 500 ऑक्सिजन सिलेंडर्स जहाजाने रवाना करण्यात आले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share