आ. सहषराम कोरोटे यांनी केला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा

सालेकसा 9: राज्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून आपल्या विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील काबराबांध, बिंजली, घोनसी येथे गारपीठ ग्रस्त शेतातील धान पिकाची पाहणी आमदार कोरोटे यांनी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान ग्रस्त शेतकर्याचे पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.

यावेळी सालेकसा तालुक्याचे तहसीलदार शरद कांबळे , नायब तहसीलदार एस.बी.उपरीकर , मा.कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने , एस. के.गणवीर ,डी.व्ही ठाकरे ,तलाठी सहारे मॅडम, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष वासुदेव चुटे,मा.पुरुषोत्तम बनोटे ,देवचंद ढेकवार, हरिभाऊ रत्नाकर व परीसरातील शेतकरी बंधु उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share