अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा : जुलैमध्ये ऑफलाइन पद्धतीने होण्याची शक्यता


वृत्तसंस्था / मुंबई :
अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी का, अशी चाचपणी शिक्षण विभागाकडून होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ९ मेपर्यंत गुगल फॉर्म भरून आपली मते विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक विद्यार्थी देऊ शकतील. सर्व विषयांची मिळून एक प्रश्नपत्रिका असेल, त्यात सर्वसमावेशक सामान्यज्ञानाचे प्रश्न असतील. या परीक्षेसाठी २ तासांचा वेळ देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर किंवा जुलै महिन्यात शाळास्तरावर ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Share