जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 2 डिसेंबरला

गोंदिया 26 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद गोंदिया, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आायोजन 2 डिसेंबर 2024 रोजी बुध्दिष्ट समाज संघ संस्थागार, जिल्हा क्रिडा संकुल जवळ, गोंदिया येथे करण्यात येणार आहे.

 सदर महोत्सवा अंतर्गत युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे तसेच महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनावर विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान नवसंकल्पना आधारित प्रदर्शन- सहभाग संख्या 5. सांस्कृतिक- समुह लोकनृत्य- सहभाग संख्या 10, समुह लोकगीत- सहभाग संख्या 10. कौशल्य विकास- कथालेखन-1, चित्रकला स्पर्धा-1, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)-1, कविता-1. युथ आयकॉन-10.

       वरील नमुद सर्व स्पर्धा बाबींमध्ये गोंदिया जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय, वरिष्ठ व कनिष्ठ  महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळ, जिल्ह्यातील इंजिनिअरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादींनी 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती यांना सहभाग घेता येईल. प्राविण्यधारकास रोख पारितोषिक शासनाकडून अनुदान प्राप्त होताच देण्यात येईल.

         स्पर्धेच्या अटी शर्ती, सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणीकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संपर्कासाठी नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे मो.8459172275, जयश्री भांडारकर मो.8847789212, क्रिडा अधिकारी ए.बी.मरसकोले मो.9420144333, क्रिडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते मो.7507493094, आकाश भगत मो.9765689705 किंवा [email protected] यावर संपर्क साधावा.

         तरी गोंदिया जिल्ह्यातील वरील स्पर्धेतील अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केले आहे.

Share