नवनिर्वाचित आमदार संजय पुराम मुंबईत दाखल, पक्ष श्रेष्ठींचे घेतले आशीर्वाद

देवरी : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये भाजपा महायुतीच्या चारही उमेदवारांचा विजय झाला. विजयी उमेदवार मुंबईला रवाना झाले. सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याने चारही नवनिर्वाचित आमदार मुंबईला पोहोचले. चारही आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे भेट घेतली. चारही मतदार संघात भाजपा महायुतीचा झेंडा फडकला. आमगाव विधानसभेतून संजय पुराम यांनी विक्रमी विजय मिळविला. रविवारी दुपारपर्यंत मतदार संघातील कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाले. आ. संजय पुराम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

Share