१ महिन्यानंतर तालुक्यातील शासकीय कार्यालये गजबजली

देवरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी शिथिल करण्यात आली.१ महिन्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, नगरपंचायत इतर शासकीय कार्यालये जनतेच्या गर्दीने गजबजली.

महाराष्ट्रात 15 वी विधानसभा अस्तित्वात आली असून लवकरच नवे सरकार राज्याची सूत्रे हाती घेईल. नवीन मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाबद्दल अवघ्या जनतेला उत्सुकता आहे. तशीच उत्कंठा आदर्श आचारसंहिता कधी शिथिल होणार याबाबतही होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी पत्र काढत राज्यातील आचारसंहिता शिथिल केल्याची घोषणा केली. हे आदेश मिळताच शासकीय कार्यालयांमध्ये लगबग दिसून आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणुका घोषित केल्या होत्या.

त्याच क्षणापासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयासह जिल्हा परिषद, पंचायत समिती तहसील कार्यालय नगरपालिका, नगरपंचायत तसेच अन्य शासकीय कार्यालयांमधील गर्दी रोडावली होती. निवडणूक विषयक कार्य व कर्तव्य यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली होती. आचारसंहितेत कामे ठप्प असल्याने सामान्य जनताही कार्यालयांकडे फिरकत नव्हती. त्यामुळे कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांचा राबता नजरेस पडत नव्हता. सोमवारपासून लागू असलेली आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने जनता त्यांची विविध कामे घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये 

विकास कामांना मुहूर्त

मागील 45 दिवसांपासून जिल्ह्यातील विकासकामे थंडावली होती, तर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्या होत्या. आता आचारसंहिता शिथिल झाल्याने विकास कामांच्या फायलींवरील धूळ झटकली जाणार आहे, तर दुसरीकडे निविदा प्रक्रियेत अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल.

अधिकारी-कर्मचारी हजर

विधानसभेची आचारसंहिता लागू असली, तरी निरनिराळ्या शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी हे निवडणुकांच्या कर्तव्यावर नियुक्त होते. 30 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर सोमवार 25 रोजी सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयांमध्ये हजर होते. यावेळी निवडणुकीत लागलेल्या अनपेक्षित निकालावर कर्मचार्‍यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. घटलेले तापमान रब्बी पिकांसाठी पोषक असल्याचे शेतकर्‍याचे म्हणणे आहे.

Share