देवरी पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीर चे आयोजन

देवरी : गोंदिया पोलीस दल आणि देवरी पोलिसांच्या वतीने जागतिक संविधान दिनानिमित्त तसेच मुंबई शहर येथे आंतकवाद हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बैंक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत उप-मुख्यालय देवरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील व पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांचे उपस्थितीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये 1 अधिकारी 42 अमंलदार व 35 नागरीक एकूण 78 लोकांनी रक्तदान केले.

Share