शेतकऱ्यांच्या धानाविषयी समस्या मार्गी लावा-आमदार सहषराम कोरोटे

★ या संदर्भात अन्न पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटिल यांना निवेदन सादर.

देवरी, ता.०८: शासनाकडून आधारभूत धानखरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी ची ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत होती. परंतु कोरोना संसर्गाच्या संचारबंदीमुळे माझ्या विधानसभा क्षेत्रातिल अनेक शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केन्द्रावर विकलेली नाही. करिता शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात यावे तसेच वनहक्क कायद्यान्वये शेतकऱ्यांना वाटप करन्यात आलेले पट्याच्या जामिनी वरील धान चुकारे व इतर शेतकऱ्यांचे धान विक्री चे चुकारे त्यांना अघाप मिळालेले नाही. त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या धान खरेदी केंद्रा मार्फत खरेदी केलेले धान अघाप उचल करण्यात आले नाही. त्यामुळे खरेदी केन्द्रावरिल धानाच्या घटात जास्त प्रमाणात वाढ होणार आहे तरी धान खरेदी केन्द्रावरील होणा-या घटाच्या वाढीस मंजूरी मिळवून देण्यात यावे या विषयावर आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयात शुक्रवारी(ता.०७ मे) रोजी राज्याचे अन्न पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटिल यांच्याशी भेट घेवून चर्चा केली आणि या संदर्भात निवेदन सादर करुण शेतकऱ्यांच्या धान विषयी समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.
दिलेल्या निवेदनात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, शासनाकडून आधारभूत धान खरेदी ची ३१ मार्च २०२१ पर्यन्त मुदत होती. परंतु कोरोना संसर्गाच्या संचारबंदीमुळे माझ्या विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केन्द्रावर विकलेली नाही. त्यांचे धान आजही त्यांच्या घरी पडून आहेत. तरी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता धान खरेदी एजेन्सीला एक दिवसाची मुदत वाढ देवुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे. तसेच वनहक्क कायद्यान्वये शेतकऱ्यांना पट्टे वाटप करन्यात आले. त्यांच्या जामिनीवरील धानाचे चुकारे व इतर शेतकऱ्यांचे धानाचे चुकाऱ्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करन्यात यावे. कारण संचारबंदीमुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक बळ मिळेल.
त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या धान खरेदी मार्फत खरेदी केलेले धान अघाप उचल करण्यात आले नाही. त्यामुळे खरेदी केन्द्रावरील धानाच्या घटात जास्त प्रामाणात वाढ होणार आहे. तरी धान खरेदी केन्द्रावरिल घटाच्या वाढीस मंजूरी मिळवून देण्यात यावे या विषयावर आमदार सहषराम कोरोटे यांनी गोंदिया येथे अन्न पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटिल यांच्याशी भेट घेवून चर्चा केली आणि या संदर्भात निवेदन सादर करुण शेतकऱ्यांच्या धानाविषयी समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.
या प्रसंगी सचिव विलास पाटिल यांनी आमदार कोरोटे यांना या निवेदनाच्या विषयावर संबंधित खात्याचे मंत्री महादेयाशी चर्चा करुण सदर मागणी पूर्ण कण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा हे ही उपस्थित होते.

Share