भंडाराचे प्रादेशिक व्यवस्थापक राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
★ आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटनेची मागणी
देवरी, ता.०८: म.रा.आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडारा येथील प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश देवीचंद राठोड यांच्या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री राठोड यांच्या विरुद्ध गैर व असभ्य वर्तवणुकीचा आरोप लावून यांच्यावर कारवाई करण्यासंबंधात आंदोलन केले. या आन्दोलनावरुन संतापलेल्या श्री राठोड यांनी भंडारा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देवरी कार्यलयाचे उपव्यवस्थापक आर.पी.चव्हाण यांना त्यांच्या कामाबद्दल आक्षेप घेवून त्याचे निलंबनाचे प्रस्ताव मुख्यालयास पाठविले. अशाप्रकारे श्री.चव्हाण यांचे मानसिक छळ करणे सुरु केले. यात त्यांच्यावर असहाय्य मानसिक ताण आल्याने त्यांचे मानसिक खच्चिकरण झाले या दरम्यान त्यांना कोरोनाची लागन झाली त्यांच्या मानसिक खच्चिकरणामुळे उपचारास त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि आर.पी.चव्हाण यांचे बुधवारी (ता.५ मे) रोजी निधन झाले श्री चव्हाण हे फार डिप्रेशन मध्ये होते. श्री राठोड यांच्याकड़ून श्री चव्हाण यांच्यावर वारंवार कार्यालयीन छळ केल्याने अविनाश राठोड यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुण निलंबनाची कारवाई करण्याची मागणी म.रा.सह. आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटेने केली असून या मागनीचे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुरुवार (ता.६ मे) रोजी पाठविण्यात आले आहे.
पाठवीलेल्या निवेदनात कर्मचारी संघटनेने म्हटले आहे की, म.रा. आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडाराचे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश देवीचंद राठोड यांच्या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी श्री. राठोड यांच्याकडून गैर व असभ्य वर्तवनुकीतून होणाऱ्या मानसिक त्रासा बाबद कारवाई करण्या संबंधात महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित खात्याचे मंत्री यांना निवेदन दिले परंतु श्री राठोड यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तथापी श्री. राठोड यांच्यावर कारवाईच्या मागणीला धरून भंडारा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जवळपास ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी दि.१२ एप्रिल २०२१ रोजी लेखनी बंद आंदोलन केले. परंतु श्री राठोड वर अघाप ही कोणतीही कारवाई झालेली नाही.
यावरून संतापलेल्या अविनाश राठोड यांनी देवरी कार्यालयाचे उप व्यवस्थापक आर.पी. चव्हाण यांच्या कामाबद्दल आक्षेप घेत यांचे निलंबनाचे प्रस्ताव मुख्यालयास पाठविले. अशाप्रकारे त्याचा मानसिक छळ सुरु केला. यात त्यांना असहाय्य मानसिक ताण झाल्याने त्यांचे मानसिक खच्चिकरण झाले. या दरम्यान श्री चव्हाण यांना कोरोनाची लागन झाली. त्याच्या मानसिक खच्चिकरनामुळे त्यांच्यावरिल उपचारास शरीराने साथ दिली नाही. अखेर बुधवारी (ता.५ मे) रोजी त्यांचे निधन झाले.
वास्तविक पाहता श्री, चव्हाण यांनी यापूर्वी प्रादेशिक कार्यालय भंडारा व मुख्य कार्यालय नाशिक येथे देखील उत्तमरित्या कार्यालयीन कार्य केले. आतापर्यंत श्री. चव्हाण यांच्या कामावर कोणत्याही प्रकारचे आक्षेप नाही. अशा परिस्थितीत श्री.चव्हाण यांच्यावर प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांनी वारंवार कार्यालयीन छळ केल्याने हे डिप्रेशन मध्ये होते. यामुळे त्यांचा मृत्यु झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहि.
तरी वरिष्ठान्ना विनंती करण्यात येते की, कै.चव्हाण यांच्या कुटुंबियांना महामंडळाकडून दहा लक्ष रूपयाची आर्थिक मदत द्यावी आणि भंडाराचे प्रभारी व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुण त्यांना तात्काळ निलंबित करावे असे म्हटले आहे.
अशा आशयचे निवेदन म.रा.सह आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटना नाशिक चे सरचिटणीस गणेश जाधव व संघटक सचिव संदीप पाटिल यांनी आपल्या स्वाक्षरी सह आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालका बरोबर, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, तथा अध्यक्ष, मुख्यसचिव व इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले असून सदर प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे.