केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आ. विनोद अग्रवाल यांना सुपूर्द केले मिनी वेंटीलेटर आणि ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन
प्रतिनिधी / गोंदिया : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून मिनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला सुपूर्त करण्यात आली. ज्यापैकी मिनी व्हेंटिलेटरचे वितरण आयुष्य हॉस्पिटल, एम. एस. आयुर्वेद सेंटर, गायत्री हॉस्पिटल, कल्पतरू हॉस्पिटल आणि मरारटोली येथील नियोजित कोविड सेंटर येथे करण्यात आले. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे संपूर्ण गोंदिया विधानसभेतील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे. शासकीय तसेच मोठे खाजगी रुग्णालयात वेंटिलेटर सुविधा उपलब्ध आहे, परंतु काही लहान रुग्णालयात व्हेंटिलेटर ची व्यवस्था नसल्याने अचानक रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर ऑक्सीजन लेवल कमी झाल्यावर व्हेंटिलेटर असलेल्या ठिकाणी स्थानांतरित करावे लागते. छोटे रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यावर त्याऐवजी मिनी व्हेंटिलेटर चा वापर केला जातो. जोपर्यंत इतर रुग्णालयातून व्हेंटिलेटरची व्यवस्था होत नाही , तोपर्यंत मिनी व्हेंटिलेटर च्या माध्यमाने रुग्णांची देखभाल केली जाते. त्यामुळे मिनी व्हेंटिलेटर हे छोट्या रुग्णालयांना देण्यात आलेल आहे असे आमदार विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट अर मशीन सुद्धा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत त्याच्या वितरण सेवाभावी रुपाने कोरोना सेंटर सुरू केलेल्या संस्थांना कार्यालयाच्या माध्यमातून वितरण करण्यात आले यामध्ये मारवाडी समाज द्वारा संचालित अग्रसेन भवन कोविड सेंटर तसेच सिंधी समाज द्वारा संचालित सिंध कोविड सेंटर यांचा समावेश आहे.
यादरम्यान जनता कि पार्टी चाबी संघटना चे गोंदिया शहर अध्यक्ष कशिश जायस्वाल, गटनेते घनश्याम पानतावणे, नगर उपाध्यक्ष शिव शर्मा, विनोद किराड आणि रोहित अग्रवाल उपस्थित होते.