शाळेच्या दर्शनाविणा जिल्हातील 1 ली ते 4थी चे 73 हजारावर विद्यार्थी ‘वर्गोन्नत’ खाजगी शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ

परीक्षेविणा पास झाल्याने जागरूक पालकमध्ये नाराजी तर एकीकडे शालेय फीस वाचली याचे मोठे आनंद

पालकांनी फी न भरल्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षकांवर मोठा अन्याय मागील वर्षापासून पगार नाहीच …

विद्यार्थ्यांचे ‘प्रगती’पत्रक प्रगतीविणा , श्रेणी ऐवजी ‘वर्गोन्नत’ लिहले दिसणार

डॉ. सुजित टेटे/ गोंदिया 7- करोनाच्या संसर्गाने वर्षभरापासून थैमान घातले असून त्याचा मोठा परिणाम शैक्षणिक यंत्रणेवर पडलेला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर श्रेणी लिहलेली असायची परंतु यावर्षी एफकेटी वर्गोन्नत लिहले असणार, ऊंची , वजन , हजर दिवस आदि बाबीच उल्लेख बघावयास मिळणार नाही हे मात्र खरे. मागील सत्रात येण परीक्षेच्या तोंडावर देशात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला आणि शाळा बंद झाल्या. स्वयं अर्थसहाय्य खाजगी शाळा पालकांनी जमा केलेल्या शैक्षणिक शुल्कावर शिक्षकांचे वेतन , शालेय इमारत भाडे आणि शाळेचा सर्व खर्च चालत असतो परंतु परीक्षा झाली नाही म्हणून देशात आणि राज्यात शालेय फीस भरू नये म्हणून मोहीम चालविली गेली आणि त्याचा मोठा फटका खाजगी शाळेवर बसल्याचे दिसून येते.

गोंदिया जिल्हात खालील प्रमाणे वर्गोन्नत करण्यात आलेले विद्यार्थी –

वर्ग (2020-2021) वर्गोन्नत झालेले विद्यार्थी
1 ली चे 2 री मध्ये 14565
2 री चे 3 री मध्ये 18542
3 री चे 4 थी मध्ये 20173
४ थी चे ५ वी मध्ये 20406
एकूण 73686

करोनामुळे मुले मागील एक वर्षापासून घरात आहेत त्यामुळे घरातील वातावरण तापत असल्याचे चित्र आहे. पालकांना त्यांच्या पाळ्यांची सवयी , वळण , आदर , शैक्षणिक नुकसान यासबंधित मोठी चिंता बघावयास मिळत आहे. खेळण्याचे स्वातंत्र , स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो परंतु करोनाच्या प्रादुर्भावमुळे मुलांच्या मनावर एकटेपणाचा मोठा परिणाम दिसून येत असल्याचे काही पालकांनी व्यक्त केले आहे.

देशातील उन्नत आणि प्रगत , शासकीय तसेच लठ्ठ पगार घेणारा वर्ग आपल्या मुलांना खाजगी शाळेत शिकवितो. खाजगी शाळेत करारतत्वावर 4 ते 5 हजार मानधन पगारावर उच्च शिक्षित बेरोजगार वर्ग शिक्षक पदावर काम करतो. दर्जेदार शिक्षणासोबत स्पर्धेच्या युगात टिकण्याचे मार्गदर्शन या उच्चशिक्षित बेरोजगार शिक्षकाकडून केला जातो. लॉकडाउन काळात शासनाच्या सूचनेनुसार शाळांनी शालेय फी सवलत दिली , ऑनलाइन वर्ग नियमित सुरू ठेवले आदि सर्व गोष्टी केल्या परंतु पालकांनी शालेय फीस भरण्यास नकार दर्शविल्यामुळे देशातील उच्च शिक्षित बेरोजगार शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून याची दखल कुठेही घेतली गेली नाही. खाजगी शाळेतील शिक्षक मानसिक , आर्थिक तणावातून जात असून येणार्‍या काळात शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होणार हे निश्चितच.

Share