पोलीस ठाणे चिचगड यांची अवैद्य दारु वाहतुक करणाऱ्यांवर धडक कार्यवाही एकुण ४,९०,०००/- रु. चा माल जप्त
चिचगड 7: गोंदिया पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. ठाणेदार श्री. अतुल तवाडे पो.स्टे. चिचगड यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे मौजा ककोडी गावातुन छत्तीसगड राज्यात चारचाकी वाहनानी दारु ची वाहतुक करीत आहेत.
अशा खबरेवर पोलीस स्टॉफ पो.ना. दुर्गादास गंगापारी/१२२८, पो.शि. विष्णु राठोड/१९५४, पो.शि. रवि जाधव/२०७६, पो.शि. संदिप तुलावी/१९०४ यांचे सह नाकांबदी केली असता वाहन क्रमांक सि.जी. ०८ ए.एन. २०५८ किंमती २,०००००/- रु. ची पाहणी केली असता, गाडीचे मागच्या डाल्याने एकुण १९ देशी दारुच्या पेटया किंमती ५७,०००/- रु. चा माल तसेच दुसरी बोलेरो पिकअप गाडी क्रमांक सि.जी. ०७ सि.डी. ०१५४ किंमती २,०००००/- रु. रु. ची पाहणी केली असता, गाडीचे मागच्या डाल्याने एकुण ११ देशी दारुच्या पेटया किंमती ३३,०००/- रु. चा माल असा एकूण ४,९०,०००/रु. चा माल अवैध्यरीत्या बिनापास परवाना विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुन करतांनी मिळुन आल्याने
पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयात दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना.दुर्गादास गंगापारी/१२२८ हे करीत आहेत.