head

गोंदिया जिल्ह्यातील पाच केंद्रात उद्यापासून 18 ते 44 वर्षामधील व्यक्तींच्या लसीकरण मोहीमेची होणार सुरुवात..

गोंदिया 30: शासनाने दि. 1 मे 2021 पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण देण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून पाच केंद्रांवर 18 ते 44 वयोगट असलेल्या व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील ज्या पाच केंद्राची निवड लसीकरणासाठी करण्यात आली त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी, उप केंद्र कुडवा, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी व ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर हे समाविष्ट आहेत. तशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे जिल्हा परिषद गोंदिया यांनी दिली आहे.

Share