वन्यप्राण्यासाठी केली पाण्याची सोय


देवरी- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त नई रोशनी या सामाजिक संस्थेतील युवकांनी जंगलात जाऊन वन्यप्राण्यासाठी पाण्याची सोय केली.
सविस्तर असे की रगरगत्या उन्हात मनुष्यालाच पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते तर मुक्या जनावरांचे काय ? हाच प्रश्न विचारात घेऊन नयी रोशनी सामाजिक संस्थेतील युवकांनी शेडेपार रोड देवरी येथील मोठ्या नाल्यावर जाऊन वन्यप्राणांकरिता पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला तसेच जवळचा पाण्याचा ढोला असल्याने त्याचे लिकेज वाले पाणी त्या बंधाऱ्यात आणले त्यामुळे आता वन्यप्राणी पक्षी,गुरेढोरे त्या ठिकाणी आपली तहान भागवू शकतील या उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर उपक्रमात निखिल गेडाम,मोहित रामटेके,अजय मरसर्कोल्हे,ओम मडावी,रोशन उके,प्रेषित चचाने,सुरेंद्र पंधरे,संजू गेडाम आदी युवक उपस्तिथ होते

Share