शासकीय योजनेच्या अमलबजावणीत दिरंगाई होता कामा नये ?

  • आमदार कोरोटे यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
  • देवरीच्या पंचायत समिती येथे विविध योजने संदर्भात आढावा बैठक.

देवरी 29: देवरी तालुका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका आहे. या ठिकाणी शासनाच्या विविध योजना घरकुल, रोजगार हमी योजना ,पाण्याची समस्या, आरोग्य सेवेची समस्या,कोरोना विषयी उपाययोजना अशा अनेक प्रश्न उपस्थित आहेत. यात घरकुल बाँधकामाची निधीचे त्वरित वाटप करा ,लोकांच्या रोजगार संबंधात अड़चन होवू नये म्हणून जास्त प्रमाणात रोजगार हमीचे कामे त्वरित सुरु होने गरजेचे आहे. पाण्याच्या टंचाई संबंधात त्वरित उपाययोजना करने, ग्रामीण क्षेत्रात कोरोना लसीकरणाच्या संख्या वाढल्या पाहिजे, लसीकरणाचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी उद्भवलेल्या समस्ये विषयी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलनी करणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषयी जनजागृती अशा शासनाच्या विविध योजनेची अमलबजावणीत दिरंगाई होता कामा नये असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी येथील पंचायत समिति मध्ये बुधवारी(ता.२८ एप्रिल) रोजी आयोजीत आढावा बैठकीत दिले.


ही बैठक आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, देवरीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, देवरीचे सी.डी.पी.ओ. एस.आर. पर्वे, देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, मुल्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरणे यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत कोरोना संसर्ग, रोजगार हमी योजना, शिक्षण विभाग, पानी पुरवठा विभाग, पशुधन विभाग, बांधकाम विभाग व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून आढावा घेतलाआणी शासनाच्या विविध योजनेचे अमलबजावणीत दिरंगाई होता कामा नये असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी दिले.

Print Friendly, PDF & Email
Share