शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुकर होणार

गोंदिया : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या सुधारित प्रस्तावाला अखेर मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला 689 कोटी 46 लक्ष 81 हजार 715 रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल आणि बांधकाम पूर्ण होताच जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुकर होईल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

पहिल्याच अधिवेशनात उपस्थित केला होता महाविद्यालायचा मुद्दा

आमदार विनोद अग्रवाल यांनी आमदारकीची शपथ घेताच पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. ज्याला मान  देत मुख्यमंत्री महोदयांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना दिले होते. वरून विद्यार्थी संख्या वाढल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्याची गरज होती. कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सुद्धा यात काही विलंब झाला. सगळे अडथळे पार करत अखेर 150 विद्यार्थी क्षमतेचा 650 खाटांच्या नवीन प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिलेले वचन पूर्ण केले.

सतत होणारा पाठपुरावा यशस्वी ठरला

हिवाळी अधिवेशनात गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया चे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या नंतर आमदार विनोद अग्रवाल यांनी वेळोवेळी प्रकरणाचा पाठपुरावा कायम ठेवला तसेच विद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अनेकवेळा भेटी घेत प्रकरण मार्गी काढण्या संबंधी विनंती केली होती.

केंद्र आणि राज्य सरकारचे मानले आभार

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया हे केंद्र शासनाच्या “Establishment of New Medical Collage attached to existing district with referral hospital” या योजने अंतर्गत असून केंद्र सरकार 60 टक्के आणि राज्य सरकार 40 टक्के रक्कम यासाठी खर्च करणार आहे. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आभार चे आभार मानले आहेत.

आरोग्य सेवा सुकर होणार

गोंदिया जिल्हा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड च्या सीमेवर असलेला जिल्हा आहे आणि गोंदियात बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या भरपूर आहे यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या व्यवस्था गोंदिया जिल्ह्यासाठी आहे ती अपुरी पडत आहे. याचा अनुभव आपण सर्व कोरोंना परिस्थिथी मधे अनुभवतच आहोत. 650 खाटांच्या क्षमतेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा नक्कीच सुकर होईल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share