तात्काळ पिक कर्ज वाटप करा -आमदार कोरोटे

शेतकऱ्यांना मिळणार ३ में पासून पिक कर्ज

देवरी २९- दरवर्षी एप्रिल महिन्यापासुन शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता पिक कर्ज वाटप होत असते परंतु कोरोना विषाणु संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी उशीर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिकदृष्टया गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही गोष्ट आमगांव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती को. ऑप. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. टेटे यांना भ्रमणध्वनि वर या विषयी चर्चा करुन शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नामुळे आता ३ मे पासून शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळणार असल्याचे वृत्त आहे.

हंगाम २०२१-२२ करिता शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक संकट उपस्थित झाला आहे . ही गोष्ट आमदार सहषराम कोरोटे यांच्या लक्षात येताच. त्यांनी लगेच बुधवार(ता.२८ एप्रिल) रोजी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती को. ऑप. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. टेटे यांच्याशी भ्रमनध्वनीवर चर्चा केली आणि शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले. या निर्देशनाला गांभीर्याने घेत श्री. टेटे यांनी जिल्ह्यातील सर्व बँक शाखेला पिक कर्ज संबंधात येत्या ३मे पासून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्याचे आदेश पत्र पाठविन्याचे कळविले आहे. आमदार कोरोटे यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळणार असल्याने विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आमदार कोरोटे यांचे आभार मानले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share