४ अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू, ताडोबा बफर झोन मधील घटना

पाण्याच्या शोधात ४ अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू, ताडोबा बफर झोन मधील घटना

चंद्रपूर : उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात येत असतो, मात्र कधीकधी ही तहान त्यांच्या जिवावर बेतून जाते, अशीच एक घटना चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा जंगलातील बफर झोन क्षेत्रात उघडकीस आली आहे.
दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे. ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वाढोली येथील शेतात ही विहीर आहे. रात्रीच्या सुमारास अस्वलांचं हे कुटुंब या विहिरीत पडलं असावं, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. आज शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य नजरेस पडलं. ताडोबातून पाण्यासाठी नेहमीच प्राणी बाहेर पडतात. पाण्याच्या शोधात फिरत असतानाच ही घटना घडल्याची शक्यता अधिक आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Share