पदोन्नती झालेल्या पोलिसांचे 12 दिवसातच डिमोशन

गोंदिया जिल्ह्याच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांमधील आरक्षण आतील पोलिसांना खुल्या प्रवर्गात पदोन्नती देण्यात आली नियमाच्या बाहेर जाऊन ही पदोन्नती करण्यात आल्याने आपण अडचणीत येऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी पदोन्नती प्रमोशन केलेल्या 249 कर्मचाऱ्यांना पुन्हा पदावनत देमोशन केले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 249 कर्मचाऱ्यांना पदावनत केल्याने पत्र 22 एप्रिल रोजी काढले आहे

जिल्ह्यात दोन हजार वर असलेल्या पोलिस पैकी अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची वेळ आली असतानाही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही शासनाने पत्र काढून खुल्या प्रवर्गातील जे नियमात बसत असतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची पत्र काढले त्या पत्राच्या अनुषंगाने गोंदिया पोलीस अधीक्षक 20 व पानसरे यांनी खुल्या प्रवर्गात बरोबरच आरक्षण प्रवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती देऊन टाकली ्यांना लगेच सोडून त्यांची बदली करण्यात आली परंतु दिलेली पदोन्नती त्यांनी पुन्हा रद्द करून त्या 249 पोलिस कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे त्यामुळे आपल्या संसाराची बिर्‍हाड घेऊन बदलीच्या ठिकाणी गेलेल्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे गोंदिया पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 21 पोलिस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून 22 मार्च रोजी पदोन्नती देण्यात आली

पोलिस नायक असलेल्या 87 कर्मचाऱ्यांना पोलिस हवालदार म्हणून आठ एप्रिल रोजी पदोन्नती देण्यात आली तर 141 पोलीस शिपायांना दहा एप्रिल रोजी पोलीस ना एक शिपाई म्हणून पदोन्नती देण्यात आली रंतु देण्यात आलेल्या पदोन्नती नियमाला धरुन नसल्याने आपण कधीतरी अडचणीत येऊ या धास्ती पाई 249 पोलीस कर्मचार्‍यांच्या पदोन्नती 22 एप्रिल रोजी रद्द करण्यात आले आहे

Print Friendly, PDF & Email
Share