ग्रामीण क्षेत्रातही कोरोना संसर्गाचा वाढता थैमान रोखण्याकरिता प्रयत्न करा- आमदार कोरोटे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश

देवरी: कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रामीण क्षेत्रातही थैमान घालने सुरु केले आहे. त्यामुळे कोरोना विषयी आदिवासी दुर्गम क्षेत्रातही लोकांना जागृत करने काळाची गरज आहे. ग्रामीण क्षेत्रातील बहुतांश लोक ताप, सर्दी व खोकला झाल्यास कोरोनाची तपासणी करन्यास घाबरत आहेत आणि आपल्या मर्जिने औषधोउपचार करित आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गात सतत वाढ होत आहे. या करीता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्गाचा वाढता थैमान रोखण्याकरीता प्रयत्न करावे असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील ककोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार(ता. २५ एप्रिल) रोजी आयोजित कोरोना विषयी आढावा बैठकीत दिले.


या बैठकीत ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ककोडी परिसरातील आरोग्य संबंधात चर्चा केली व आरोग्य केन्द्राची पाहनी करुण आढावा घेतला आणि कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव पासून ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठेवन्याचे निर्देश दिले.
या आढावा बैठकीत आमदार कोरोटे यांच्या सह ककोडी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश कुकडे,ककोडीचे सरपंच सौ. मडावीताई,ग्रा. पं. सदस्य सौ. धरमगुड़ेताई, सामाजिक कार्यकर्ता बबलु भाटिया, अमरदास सोनबोइर, पोलीस पाटिल श्री शहारे व इतर आरोग्य कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share