पत्रकार महेंद्र वैद्य यांचे निधन

बहुजन चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यशस्वी उद्योजक व पत्रकार, लेखक, समाजसेवक अशी ओळख असलेले महेंद्र वैद्य (वय ४२) यांचे नुकतेच निधन झाले…

प्रहार टाईम्स| प्रतिनिधी
देवरी : बहुजन चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यशस्वी उद्योजक व पत्रकार, लेखक, समाजसेवक अशी ओळख असलेले महेंद्र वैद्य (वय ४२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
अनेक वृत्तपत्रामधून त्यांनी बातमीदार म्हणुन काम केले. व ते सध्या पोस्टमास्टर पदावर बोरगाव येथे कार्यरत होते. अशा चळवळीचा कार्यकर्ता अचानक निघून जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोविड केअर सेंटर मधुन त्यांना आजच डिस्जार्ज देण्यात आले होते.

Print Friendly, PDF & Email
Share