चिकन आणि अंडीचे कोरोनाच्या ग्रहणाने भाव आपटले…

कोरोना म्हटलं की समोर येतं ते मास्क, निर्बंध आणि गरीबी. कोरोनाने भल्याभल्या उद्योगधंद्यांना ठप्प केलं. आताही कोरोनाची दहशत ही दिवसेंदिवस वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंचे असो नाहीतर भाजीपाल्याचे भाव असो यावर नियंत्रण नाही, आपणही आपल्या सभोवताली बघत असता कोणाला एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतोय ते आता हेच लोक उपाशी राहत आहेत.प्रत्येक क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. शरीरास पोषक अशी अंड्यांना या संकटातही आज नेहमीप्रमाणेच आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बहुतांश लोक अंडी खात असल्याचंही चित्र समोर आलंय. पण तुम्हाला माहीती आहे का? या कोरोनाचा अंडी आणि कोंबडीवर फार परिणाम झाला आहे.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खाणं गरजेचं वाटणाऱ्या चिकनचे दर निम्म्याने कमी झालेत. अंड्यांना बरीच मागणी आहे, परंतु पुरवठा केला जात नाही. परिणामी कुक्कुट व्यवसाय करणाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

गाझीपूर मंडईमध्ये 8 ते 10 दिवसांपूर्वी कोंबड्या 115 ते 120 रुपयांना विकल्या जात होत्या. दुसरी व्हरायटी 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत होती. परंतु दिल्लीत पूर्ण लॉकडाऊन आणि इतरत्र बाजारपेठा बंद असल्याने कोंबडीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला.परिणाम असा झाला की, पोल्ट्रीच्या किमती दररोज 10-15 रुपये दराने घसरू लागल्या. रविवारी गाझीपुरातील कोंबडी 65 रुपयांना विकली गेली, तर काल सोमवारी 58 रुपये किलो विकले जात आहे.यासह 1400 ते 1700 ग्रॅम वजनाचा कोंबडा 56 रुपयांच्या किमतीत आणि 2.2 किलो वजनाचा कोंब 58 रुपये दराने विकला जात आहे. त्याचबरोबर 900 ग्रॅम वजनाचे कोंबडी 45 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share