‘कोरोना’चे दिवसभरात 48700 नवीन रुग्ण, 71 हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई– राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून 65 हजार ते 70 हजार नव्या रुग्ण आढळून येत होते. राज्यात नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ वेगाने होत असताना आज राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. काल राज्यात 66 हजार 191 नवीन रुग्ण आढळून आले होते. कालच्या तुलनेत आज मोठी घट झाली असून हा फरक 17 हजार 491 एवढा आहे. गेल्या 24 तासात राज्यात 48 हजार 700 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 71 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज राज्यात 71 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 524 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 65 हजार 284 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.5 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 74 हजार 770 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 99 हजार 977 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 59 लाख 72 हजार 018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 43 लाख 43 हजार 727 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.72 टक्के आहे. सध्या राज्यात 39 लाख 78 हजार 420 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 30 हजार 398 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 99977, मुंबई 72230, ठाणे 76831, नाशिक 43109, औरंगाबाद 14750, नांदेड 10906, नागपूर 78522, जळगाव 13064, अहमदनगर 24117, लातूर 11961 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Share