कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी गोंदिया जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध

सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढलेला असून रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आणि रुग्णांची काळजी घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याकरिता गोंदिया जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले आहेत.जिल्हा प्रशासनाने एकूण 20 खाजगी रुग्णालयांना कोविड उपचाराची मान्यता दिलेली असून या प्रत्येक रुग्णालया करीता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. रुग्णालयाने रुग्णाचे बिल नियमाप्रमाणे आकारणी करावे, अधिकचे पैसे घेऊ नये याकरिता हे नोडल अधिकारी कार्यरत आहेत. नोडल अधिकार्‍यांची नेमणूक केल्यामुळे रुग्णालयाने अधिकचे बिल आकाराने या बाबीला चाप बसलेला आहे.

गोंदिया जिल्ह्यामधील रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये याकरिता अदानी प्रकल्पाने पुरविलेल्या CSR फंड मधून 13KL एवढ्या क्षमता असणाऱ्या ऑक्सिजन टाकीचे उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये मोठी सुविधा निर्माण होणार आहे. बऱ्याचदा रुग्णांना अनेक प्रकारची माहिती हवी असते, ही माहिती त्यांना सुलभतेने मिळावी याकरिता केटीएस रुग्णालयामध्ये एक मोठी स्क्रिन लावण्यात आलेली आहे आणि या स्क्रीनवर सर्व प्रकारची माहिती प्रदर्शित केली जात आहे. गोंदिया नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या कामी विशेष पुढाकार घेतलेला आहे.पूर्वी केटीएस रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांची बसण्याची गैरसोय व्हायची ही बाब जिल्हा प्रशासनाने मुख्याधिकारी नगरपालिका यांना निर्देश देऊन तेथे एक मंडप उभारलेला आहे. बसण्यासाची सुविधा निर्माण केलेली आहे. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याकरिता एक हक्काची जागा निर्माण झालेली आहे.

बऱ्याचदा कुठल्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहेत? कोणत्या रुग्णालयात जायचे? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. करिता रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांना कोणत्या रुग्णालय मध्ये किती बेड उपलब्ध आहेत? याची माहिती व्हावी याकरिता NIC चे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यांच्या मार्फत ऑनलाइन बेड मॅनेजमेंट सिस्टीम (Online Bed availability information system) निर्माण करून नागरिकांना ही माहिती gondia.nic.in वर उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे रुग्णांची मोठी सुविधा झालेली आहे. जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कोविड केअर सेंटर मध्ये दर्जेदार जेवण मिळावे याकरिता जिल्हा प्रशासन आग्रही आहे. याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील माविमच्या बचत गटांना हे काम देण्यात आलेले असून, त्यांच्यामार्फत रुग्णांना दर्जेदार जेवण पुरविले जाते. माविम बचत गटाच्या महिलांना हे काम दिल्यामुळे त्यांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे. शिवाय रुग्णांना दर्जेदार जेवण मिळत आहे. शासकीय कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर येथे पंखे , कुलर यांची व्यवस्था अगदी सुयोग्य असावी जिल्हा प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे व प्रत्येक शासकीय रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर येथे कुलरची व्यवस्था करून घेतलेली आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोविडचा मुकाबला करत असताना अनेकदा Frontline warrior, शासकीय कर्मचारी हे कोविड पॉझिटिव होतात. त्यांना बेड मिळावे याकरिता 10% बेड आरक्षित करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला सर्व रुग्णालयाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. कोणताही कोविड worrior कोरोनाने बाधित झाल्यावर त्याला बेड मिळावा याकरिता वरिष्ठ अधिकारी स्वतः कसून प्रयत्न करतात. प्रसंगी रुग्णालयाला स्वतः फोन करून कोविड वॉरियर यांना बेड उपलब्ध करून देतात. यामुळे कोविड योध्यांचे मनोबल वाढलेले आहे. शिवाय अशा रुग्णांना रेमडिसिविर ची गरज भासल्यास ते देखील उपलब्ध करून देण्याकरिता व्यक्तिशः पुढाकार घेत आहेत. सध्या अनेक मजुरांची मजुरी बुडालेली आहे.अनेक कामे बंद आहेत.अशावेळी उपासमार होऊ नये याकरिता शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही शिवभोजन थाळी दर्जेदार असावी याकरिता जिल्हा प्रशासन आग्रही आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी हे या बाबीवर सातत्याने नियंत्रण ठेवून असतात.जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पूर्वी केटीएस मध्ये डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल हे 100 खाटांचे होते आता त्याचे रूपांतर 220 खाटांच्या रुग्णालय मध्ये केलेले आहे. याकरिता अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांनी देखील विशेष प्रयत्न केलेले आहेत.अनेकदा डॉक्टरांना उशिरापर्यंत काम करावे लागते. बरेचदा त्यांच्या राहण्याचे ठिकाण दूर असते. अशा डॉक्टरांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने डॉक्टरांच्या निवासाची सुविधा हॉटेलमध्ये करून दिलेली असून तेथे त्यांच्या भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे. अशी सुविधा झाल्यामुळे डॉक्टरांची मोठी सोय झालेली आहे. त्यामुळे ते रुग्णांना आपली सेवा अधिक कार्यक्षमतेने देत आहेत.

गोंदिया येथे सिलेंडर मध्ये ऑक्सीजन भरण्याचा एकच प्लांट कार्यरत आहे. हा प्लांट पूर्वी एकाच शिफ्ट मध्ये काम करावयाचा. परंतु जिल्हा प्रशासनाने याकामी पुढाकार घेऊन तसेच Ion Exchange India Limited कंपनी आणि अदानी पावर कंपनी तिरोडा यांची मदत घेऊन, उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि तहसीलदार गोंदिया यांच्या मदतीने हा प्लांट दोन शिफ्ट मध्ये कार्यरत केलेला आहे. यामुळे अधिकचे आक्सिजन सिलेंडर भरून उपलब्ध होत आहेत.याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया कोविड विषयक माहिती देण्याकरिता हेल्पलाइन सुरू केलेली आहे.करावयास लावलेली आहे. या हेल्पलाइनचे क्रमांक 8308816666 व 8308826666 हे आहेत. हेल्पलाइन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारची माहिती मिळत आहे.कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याची हेळसांड होऊ नये, त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावल्या जावी,मृतदेहामुळे कोविडचा प्रसार होऊ नये, याकरिता नगरपालिका गोंदिया च्या माध्यमातून खास चमुचे गठन केले आहे . कोविड रुग्णांच्या शवविल्हेवाटीची यथायोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे.उपरोक्त प्रमाणे जिल्हा प्रशासनाने माननीय पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांनी बैठकीमध्ये दिलेले निर्देश व गोंदिया जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनांवर अंमल करून विविध उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवून कोविड रुग्ण तसेच कोविड रुग्णांचे नातेवाईक यांना सुविधा उपलब्ध होण्याकरिता विविध उपक्रम राबविलेले आहेत. कोविड रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे या सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत.

Share