“तथागत बुद्धध: संक्षिप्त जीवन आणि दर्शन” पुस्तकाचे अत्यंत साधेपणाने प्रकाशन

प्रहार टाईम्स| भुपेंन्द्र मस्के
देवरी दि.२५ गौरी प्रकाशन वर्धा द्वारे प्रकाशित “तथागत बुद्धध : संक्षिप्त जीवन आणि दर्शन “या पुस्तकाचे अत्यंत साधेपणाने विमोचन करण्यात आले.हे पुस्तक देवरी येथील एम बी पटेल महाविद्यालयात कार्यरत डॉ. वर्षा गंगणे,डॉ.पुष्पा तायडे प्राचार्या लोक महाविद्यालय वर्धा,निवृत्त आई ए एस अधिकारी श्री. विश्वनाथ शेगावकर या तीन लेखकांनी लिहिले आहे.

बुद्ध धम्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेद्वारे आयोजित भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या या तीन लेखकांचे अभ्यासपूर्ण निबंध या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.शांती आणि समाधान यासाठी शाश्वत आत्मसमाधान व बुद्धाचा जीवन परिचय या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना काळात चिरंतन समाधान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास बुद्धाचे तत्वज्ञान अत्यंत अनिवार्य तसेच उपयोगी आहे हे सदर पुस्तकातून मांडले आहे.

सदर पुस्तक प्राचार्य डॉ.संजय धनवटे, प्राचार्य डॉ.रामकृष्ण टाले, रातुम नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे ,सौ.इंदूरवाडे, प्रा.बंडू नवदेवे यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी प्रा.शुभांगी मूनघाटे,गायत्री गुप्ता तसेच लेखिका डॉ.वर्षा गंगणे उपस्थित होते. वाचकांना हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरणारे व समाधान मिळवून देणारे ठरेल असे विधान याप्रसंगी मान्यवरांनी केले.डॉ.वर्षा गंगणे यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यापैकी अनेकांना राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले आहेत.लेखिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share