देवरी तालुक्यातिल 18 खाजगी डॉक्टर्स ला तहसीलदारांनी दिली सक्त ताकीद

प्रा.डॉ.सुजित टेटे

देवरी 23: देवरी तालुक्यात पहिल्यांदाच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या 18 डॉक्टर्स ला ILI व SARI रिपोर्ट नियमित सादर न केल्याबाबत देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी सक्त ताकीद दिली आहे.

सविस्तर वृत्त असे कि साथरोग कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या संदर्भ कायद्यानुसार नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर ताकीद देण्यात आली आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देवरी तालुक्यात वाढत असून देवरी तालुक्यात रुग्ण मोठ्याप्रमाणात बाधित झालेले आहेत . त्या अनुषंगाने सर्व खाजगी डॉक्टर्स ला त्यांच्या दवाखान्यातील
ILI व SARI रिपोर्ट न चुकता दररोज वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवरी येथे सादर करणे बंधनकारक आहे .

तालुक्यातील 18 डॉक्टर्स यांनी यांच्या दवाखान्यातील माहिती प्रशासनाला दिली नाही असे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या निदर्शनास येताच कार्यालयीन पत्राद्वारे सदर दवाखान्याच्या डॉक्टर्स ला सक्त ताकीद देण्यात आली असून सदर माहिती नियमित सादर न केल्यास दवाखान्याची मान्यता व परवाना रद्द करण्यात येणार तसेच आपल्या रुग्णालयाला सील करून फौजदारी कारवाई करून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 नुसार व भारतीय दंड संहिता कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897नुसार कायदेशीर व दंडनीय कारवाई करण्याची सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share