देवरी येथे जनतेसाठी कोविड केंद्र सुरु करण्याची प्रशासनाची जय्यत तयारी

तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनात आखला जात आहे नियोजन

डॉ.सुजित टेटे
देवरी 22: राज्यात करोनाचे वाढले प्रमाण बघता लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन ची कमतरता भासू लागली आहे. देवरी तालुक्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णावर इथेच उपचार मिळावा या उद्देशाने देवरी येथील तालुका क्रीडा संकुल देवरी येथे जनतेसाठी कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हाधिकारी गोंदिया यांना परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली.

यावेळी जे रुग्ण देवरी कोविड केंद्रात भरती आहेत त्यांच्यासाठी खालील औषधांची दररोज गरज भासत असून दानशूर व्यक्तींनी सदर औषध कोविड केंद्र देवरी , शासकीय विश्राम गृह डॉ.ललित कुकडे , तालुका आरोग्य अधिकारी यांचे कडे जमा करण्यास विनंती करण्यात आलेली आहे.

औषधांची यादी खालील प्रमाणे :
Tab Favipiravir 400mg (1000)
Tab. Dexona 6mg (500)
Tab. Azithromycin 500mg (500)
Tab. Ivermectin 12mg (500)
Nebuliser machine 5
Livolin 0.63mg respule (500)
Asthalin 10ml (100)
Budocort 0.5 mg respule (500)
Distill water ampoule (500)
Masks (2000)
Hand gloves 7 no. (2000)
Oxygen concentrator 5L/min (5)
Oxygen cannula 500 pcs
Nebuliser masks 50

देवरी येथील इच्छुक दानशूरांनी या कठीण प्रसंगी आपले योगदान द्यावे असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे .

Share