भागी/शिरपूर येथे कोरोना तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रहार टाईम्स| प्रतिनिधी
देवरी : तालुक्यातील भागी व शिरपूर येथील समाज मंदिरात आरोग्य विभाग व गटग्रामपंचायत भागी/ शिरपूर च्या वतीने तिन दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी भागी येथे २१ ग्रामस्थांची एन्टिजेन तपासणी करण्यात आली तर यापैकी ०५ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला .दुसऱ्या दिवशी भागी येथे ८९ ग्रामस्थांची एन्टिजेन तपासणी करण्यात आली तर यापैकी ०८ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला तर शिरपूर येथे तिसऱ्या दिवशी ३१एन्टिजेन तपासणीत १ ग्रामस्थांचा अहवाल सकारात्मक आला व २५ आरटीपीसीआर चाचणी नमुने गोळा करण्यात आले असुन अहवाल अप्राप्त आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
ग्रामपंचायतीचे सरपंच धनराज कोरोंडे व सदस्य भुपेन्द्र मस्के यासंदर्भात आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला होता. पाठपुराव्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, तर काही नागरिकांना लक्षणे आढळून येत असल्याने स्वत: हून मस्के व ग्रामसेवक वाघमारे यांनी प्रथम तपासणी करून घेतली. व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.आर.डंभारे, आरोग्य पर्यवेक्षक एन.डी.बोरकर, श्री.कवरे, आरोग्य सेवक जे.टी.उंदिरवाडे, के.टी. राऊत, मंगेश हिंगे, आशा सेविका कलावती भोयर, रंजना कोरोंडे व कोविड पर्यवेक्षक एस.एस.नरेटी आदीच्या पथकाने कोरोना तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी ए.आर डंभारे यांनी कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याविषयी नागरिकांना मार्गदर्शन व औषधोपचार केले. यावेळी सरपंच धनराज कोरोंडे, उपसरपंच रविंद्र भोयर, सदस्य भुपेंद्र मस्के, विलास मानकर, लेकचंद राऊत,हिरण कोरोंडे, भारती कोल्हारे, पुजा कापसे, अंतकला भोयर, दामीनी भोयर ग्रामसेवक टी.आर. वाघमारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी चंद्रकांत मेश्राम व हितेश खरवडे उपस्थित होते.