धक्कादायक ! आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला चक्क चपलेने मारहाण, सडक/ अर्जुनी येथील घटना
स अर्जुनी 15 :सध्या सर्वत्र कोरोना चा उद्रेक वाढला आहे, अश्यात आपल्या जीवाची बाजी लावीत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत, मात्र समाजातील नागरिक काही कारणास्तव अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला करीत असल्याच्या बऱ्याच घटना रोज घडतात , नुकतेच दिनांक 13 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यात सुद्धा अशीच घटना घडली होती, त्यातील 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्या नंतर आता गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात चक्क अधिकाऱ्यांवर चपलेने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्या मुळे हल्ले खोरांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 15/01/2021 रोजी सकाळी 11.00 वा. दरम्यान दिनेश श्रीराम मेश्राम वय 35 वर्ष हा आपल्या परिवारातील सदस्यांना कोविड केअर सेंटर, आदिवासी मुलांचे वसतिगृह सडक अर्जुनी येथे कोविड चाचणी करण्यासाठी गेला होता.
सदर वेळी परिवारातील सदस्यांना कोविड सेन्टर मध्ये सोडून तो घरी निघून गेला. सायंकाळी 04.00 वा. सदर इसम हा कोरोना केअर सेन्टर येथे गेला असता सकाळ पासून लाईन मध्ये लागून सुद्धा अजूनपर्यंत त्याच्या परिवारातील सदस्यांची कोरोना चाचणी का झाली नाही म्हणून तेथे शासकीय काम करणारे कर्मचारी नामे भौतिक देवराज वैद्य यास मारहाण, व शिवीगाळ करू लागला.
तेव्हा तेथील शासकीय काम करणारे डॉ. विनोद भुते ( नोडल अधिकारी, कोविड केअर सेंटर, सडक अर्जुनी ) हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा चपलाने व लाथा बुक्याने मारहाण केली व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
त्यावर डॉ. विनोद भुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे डुग्गीपार येथे अपराध क्र. 79/2021 कलम 353, 332, 504, 506 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी नामे दिनेश श्रीराम मेश्राम वय 35 वर्ष, रा. सडक अर्जुनी यास अटक करण्यात आली आहे. ठाणेदार सचिन वांगळे यांनी तक्रारीच्या आधारे आरोपीला तात्काळ अटक केल्याची माहिती दिली आहे.