धाब्यावर अवैधरित्या लोहा खरेदी-विक्री करणाऱ्यावर देवरी पोलिसांची कारवाई
प्रहार टाईम्स
देवरी 16: रेवचंद सिंगनजुडे ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी हे आपले पोलीस स्टॉप सहा पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग राबविताना मुखबीर कडून गोपनीय माहिती मिळाली की मौजा डोंगरगाव येथे रामदेव धाब्यावर अब्दुल सय्यद राहणार रामदेव बाबा धाबा हा लबाडीने खुले जागेत लोहा सरिया माल घेत असून विक्री करीत आहे. अशा माहितीच्या आधारे रामदेव बाबा धाब्याची पाहणी केली असता त्यांचेकडून खुले जागेत 8mm 12 बार 53 किलो, 12mm 10 बार 103 किलो , 10mm चे 10 बार 65 किलो 6m चे24बार 94 किलो असा 315 किलो जुमला किमती सतरा हजार तीनशे रुपये चा माल संशयावरून कलम 41 (1) (ड) जा फौ अन्वये जप्त करण्यात आला सदर माला बाबत कागदपत्रे व मालकीहक्क संबंधाने विचारपूस केल्याने लबाडीची उत्तर दिले व त्यांचे कडे कोणतेही कागदपत्र मिळून आले नाही. गैरअर्जदार अब्दुल सलाम निवास अली सय्यद वय 39 वर्ष रामदेव बाबा रामदेव बाबा धाबा डोंगरगाव राहणार नागपूर पोलीस स्टेशन कपिल नगर जिल्हा नागपूर यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन देवरी येथे अदखलपात्र गुन्हा क्रमांक 78/2021 कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत अदखलपात्र नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया जालंधर नालकुल उपविभागीय पोलिस अधिकारी आमगाव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सिंगनजुडे ,पोलीस फौजदार उके, पोलीस हवालदार मडावी, पोलीस हवालदार परसमोळे, पोलीस हवालदार करंजीकर ,पोलीस शिपाई भांडारकर, पोलीस शिपाई डोहळे, चालक पोलीस हवालदार साखरे यांनी केली आहे.